सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक नेते भाऊ कडू गुरुजी यांचे सुपुत्र शिरीष कडू यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया कोरोना महामारीमुळे ऑन लाईन करण्यात आली.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. गिरीश गुणे, संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, राजू मुंबईकर आदींच्या सहकार्याने अध्यक्षपदी शिरीष कडू, सचिवपदी जयंत म्हात्रे व इतर रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. गिरीश गुणे यांनी रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या कार्याची प्रसंशा करीत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला असल्याचे सांगितले. मॅरेथॉन व इतर तरुणांना प्रोत्साहन घेणारे कार्यक्रम करीत आहेत. आताच्या कोरोनाच्या महामारी संकटावर मात करण्यासाठीही ते कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी स्वर्गीय दि बा पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागणीनुसार कोरोना कोविड १९ वर मात करण्यासाठी उलवे नोडमध्ये सिडकोच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला मंजुरी मिळून हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच उलवे नोडमध्ये कोविड सेंटर उभे रहाणार असुन त्याला लागणारे यथाशक्ती सहकार्य रोटरी क्लब करणार असल्याचे रविशेठ पाटील यांनी सांगितले.
यावेळी इतरांनी मार्गदर्शन करून नवनिर्वाचित कमिटीला शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष शिरीष कडू यांनी माझ्यावर जी मोठी जबाबदारी सोपविली आहे. ती यशस्वीपणे पार पाडून उलवे नोडमधील समस्यां आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.






Be First to Comment