Press "Enter" to skip to content

मुलांना शाळेची गोडी वाटावी यासाठी प्रयत्न

रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा

सिटी बेल • पनवेल •

अंगणवाडीतील मुले जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे सलग दोन वर्षात अंगणवाडीत गेली नाहीत.त्यांना शाळेची गोडी वाटावी म्हणून शासनाच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी रा.जि.प.शाळा वारदोली केंद्र-नेरे, ता.पनवेल येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उघाटन ग्रुप ग्रामपंचायत वारदोलीच्या उपसरपंच जान्हवी बताले व केंद्राच्या केंद्र प्रमुखा गीता तिबाडे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे दाखलपात्र विदयार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून लेझीम ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. सर्व दाखलपात्र मुलांचे औक्षण करत त्यांच्या तळहाताचे ठसे खास बनविलेल्या बोर्डवर उमटवण्यात आले.” सेल्फी विथ मम्मी” हा अनोखा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

सदरच्या मेळाव्याचा प्रमुख उद्देश म्हणून सात टेबलांवर विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची चाचपणी घेण्यासाठी साहित्यांची मांडणी करण्यात आली होती.या साहित्याद्वारे विदयार्थ्याच्या विविध कृती घेऊन त्यांची नोंद विकास पत्रकात नोंदविण्यात आली. तसेच विद्यार्थी व पालक यांच्यासाठी छोट्या खेळांचे सुद्धा आयोजन करण्या आले होते. माता पालकांनी याचा विशेष आनंद घेतला.

केंद्रप्रमुखा तिबडे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विविध दाखले व उदाहरणांद्वारे पालकांचे मार्गदर्शन केले गेले. मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र बताले, ग्रामपंचायत सदस्य हेमंत तांडेल, उपाध्यक्ष गुरुनाथ शेळके, सदस्य जगदीश पाटील, प्रकाश मिसाळ, सुभाष तांडेल, महेश बाबरे, सुनील कथारे, वैशाली पाटील, सोनल आतकर, आशा भोपि, वर्षा म्हात्रे, सुनिता पाटील, तुकाराम कथारे,बबन मते, पंढरीनाथ पाटील, सर्व ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी, उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी विशेष मेहनत घेऊन शाळा पूर्वतयारी मेळावा अतिशय उत्साहात पार पाडला. दोन्ही शिक्षकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.