सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे कोरोनातून बरे झाले आहेत.कोरोना संसर्गात खालापूर तालुका वेगाने पुढे जात आहे.अनेक शासकिय अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये पोलीस, तहसील,ङाॅक्टरसह विविध प्रशासकिय विभागातील अधिका-यांचा समावेश आहे.
खोपोलीत तर कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला होता.कोरोना रोखण्यात यश मिळण्या ऐवजी खोपोलीतील राजकिय भांङणाची चर्चा रंगली होती.प्रशासन अपयशी ठरत असताना खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेटे याना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रजेवर होते.परिस्थितीच गांभीर्य ओळखून रायगङ जिल्हाधिकारी निधी चौधरी यानी खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचेवर प्रभारी म्हणून जबाबदारी दिली.अगदी दोन आठवङ्यातच प्रभारी कारभारात सर्वांची मोट बांधत खोपोलीत घरोघरी तपासणी शिबिर भणगे यानी राबविले.त्यामुळे गणेश शेटे यांची सध्या उणीव जाणवत नसून कोरोना लढाईत शेटे याना आरामाची गरज आहे. प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे सक्षमपणे जबाबदारी सांभाळत असल्याने गणेश शेटे महिनाभर तरि कारभार स्विकारणार नसल्याची माहिती मिळाली आहे.






Be First to Comment