Press "Enter" to skip to content

कानसा – वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड

शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामानाच्या किटचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले चौक वावर्लें येथील कानसा – वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दिपकदादा पाटील यांच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले.
कानसा – वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपकदादा पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा – वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश यादव व कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.यावेली राज्यातील कोल्हापूर शाहूवाडी तालूक्यातील विरळे या गावी गोरगरीब जनतेला धान्य कीट वाटप केले. पळसवडे येथे कानसा – वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक पाटिल यांच्यावतीने अध्यक्ष कृष्णा पाटील, युवा अध्यक्ष महेंद्र पाटील दिपकृष्ण बिगरशेती नागरी पतसंस्था मॅनेजर तानाजी पाटील ,युवा कार्यकर्त्यांनी कानसा – वारणा युवती मंचच्या संपदा कुलकर्णी इतर तरूनी उपस्थित होत्या. तर गेवराई,केज,बीड ,आष्टी ,धारूर,माजलगाव तालुक्यातील मालेवाडी, ब्रम्हागाव, जवळबन,दहिफळ,पाली,करचुंडी,लुखामसला,खर्डावाडी आदी गावांत स्थानिक युवकांना सोबत घेऊन कानसा – वारणा फाउंडेशनचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,बाळू काळे, आनंद ढाकणे, सारिका गायकवाड, रोहिणी मारगुडे, संतोष गायकवाड, युवराज सानप, परमेश्वर सानप, गणेश करपे, नंदिनी गालफाडे,ज्योती क्षिरसागर, अमोल नवले,हमीद सय्यद, बाबा पवार ,निशिकांत जोगदंड आदीने कानसा – वारणा फाउंडेशन बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यात परिश्रम घेतले.
तर लोखंडी सावरगाव येथे कानसा – वारणा फाउंडेशन ग्रामदैवत महादेव मंदिर परिसरात वृक्ष लागवड ,माजलगाव येथील मालेवाडी गावात काणसा -वारणा फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील युवकांना संघटीत करून वृक्ष लागवड ,कानसा – वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक पाटिल अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कानसा – वारणा फाउंडेशनचे महाराष्ट्र यूवा उपाध्यक्ष नागेश यादव व महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा काचंनताई जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कानसा – वारणा फाउंडेशनने नाशीक, नगर,रायगड,बिड येथे वृक्ष वाटप व लागवड तसेच लोखंडी सावरगाव ता .अंबाजोगाई येथे कानसा – वारणा फाउंडेशन ग्रामदैवत महादेव मंदिर परिसरात वृक्ष लागवड तर रायगड वावर्ले तीनघर, बोरगाव , खैराट व महाराष्ट्रातील जिल्ह्यात 2000 शालेय साहित्य वाटप करण्यात आले या वेळी रूपाली बांडे सूमीता दिपक पाटिल ग्राम पंचायत सदस्य ठकूराम झोरे व दत्ता जाधव याच्यांहस्ते वाटप करण्यात आले. कानसा – वारणा फाउंडेशनच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा कांचनताई जाधव व कानसा – वारणा फाऊंडेशनचे युवा आघाडीचे उपाध्यक्ष नागेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यात फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.कानसा – वारणा फाऊंडेशनने वाढदिवसा निमित्ताने हाती घेतलेला सामाजिक उपक्रम यशस्वी पणे पार पाडल्याने नागरिकात फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाबाबत सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.