Press "Enter" to skip to content

सुधागडात शेकापच्या वर्धापन दिनी गावोगावी फडकला लालबावटा

पक्षसंघटना अधिक मजबुतीसाठी जोमाने काम करा- सुरेशशेठ खैरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सिटी बेल लाइव्ह /पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

मागील अनेक वर्षापासून अत्यंत उत्साहवर्धक, दिमाखदार व वैभवपूर्ण साजरा होणारा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा कोरोनाच्या व निसर्ग चक्री वादळाच्या पाश्वभूमीवर सुधागड सह जिल्ह्यात सामाजिक भान राखून साधेपणाने साजरा करण्यात आला. सुधागड तालुक्यातील अनेक गावांत व घरांवर शेकाप चा लालबावटा दिमाखात फडकताना दिसला. सुधागड पालीत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची यशस्वी घौडदौड पुढे अशीच सुरू ठेवून जनमानसाच्या मनामनात यापुढेही शेकाप विषयी कायम आदरभाव व आपलेपण निर्माण होणेकामी सर्वानी अधिक झोकून देऊन जनहिताची कामे करा. पक्ष संघटना अधिकाधिक बळकट कशी होईल यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन तनमन धनाने योगदान द्यावे असे आवाहन खैरे यांनी केले.

सुधागडसह जिल्ह्यात शेकाप कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी, तसेच गावागावात कार्यकर्त्यांनी शासन नियमांचे पालन करून वर्धापन दिन साजरा केला. शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे डाव्या विचारांच्या पुरोगामी कार्यकर्त्यांचा उत्साहाचा दिवस असतो, कार्यकर्ते वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, व आपल्या नेत्यांचे विचाररूपी सोने आनंदाने लुटत असतात, मात्र पहिल्यांदाच
वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

पालीतील कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश शेठ खैरे, तालुका चिटणीस उत्तम देशमुख, खरेदी विक्री संघाचे किसन उमटे, पंचायत समितीच्या सदस्या सविता हंभिर, ऍड: सुभाष पाटील, युवक अध्यक्ष अतिश सागळे, माजी चिटणीस राजाराम देशमुख, गजानन शिंदे, संजोग शेठ, सुधीर सखरले, सुमेध खैरे, भारतीताई शेळके, विठ्ठल सिंदकर, श्री नागे साहेब, प्रसाद काटकर, प्रशांत नागोठाकर, हेमंत शिळीमकर, संजय हुळे, पद्माकर काटकर, डी के देशमुख, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.