विना हेल्मेट फिरणा-या भावाना ताराराणी ब्रिगेड भगिनींनी बांधल्या राख्या

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोरोना संकटात मास्क अनिवार्य झाला असून सर्वाधिक मृत्यूचे कारण असलेल्या रस्ते अपघाताबाबत देखील जागरूकता यावी यासाठी विना हेल्मेट दुचाकिवरून प्रवास करणा-याना ताराराणी ब्रिगेङच्या वतीने राखी बांधून स्वतःच तस कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
दुचाकी अपघातात हेल्मेटमुळे अनेकदा जीव वाचल्याचे उदाहरण आहेत.परंतु हेल्मेटचा वापराकङे दुर्लक्ष होते.रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून ताराराणी ब्रिगेडच्या रायगड जिल्हाध्यक्षा कविता खोपकर,खालापूर तालुका अध्यक्षा वर्षा मोरे,खोपोली शहराध्यक्षा स्मिता कचरे,कार्याध्यक्षा नीलम समेळ,उपाध्यक्षा किशोरी चेऊलकर,मनीषा नरंगळे,सदस्या वर्षा वडजे,संगीता काळे,काव्या खोपकर,मंगला दर्णे,मनिषा विचारे व समीरा मोरे या भगिनीनी जुन्या मुंबई पूणे महामार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना हेल्मेट फिरणा-या भावाना राखी बांधून हेल्मेट वापरासाठी भावनिक आवाहन करण्यात आले.
दुचाकिवर हेल्मेट वापरण्याचे स्टिकर्स देखील लावण्यात आले. या उपक्रमात खोपोली पोलीस व वाहतूक पोलीसांचे सहकार्य मिळाले.
दुचाकीस्वारांना स्वतःचे रक्षण, परिवाराची जबाबदारी ओळखून हेल्मेट वापरले पाहिजे. वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. वर्षा मोरे
ताराराणी ब्रिगेड-खालापूर तालुका अध्यक्षा






Be First to Comment