कोरोनासारख्या आजारांशी दोन हात करण्यासाठी नवी मुंबईत परिचारकांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा !
सिटी बेल • नवी मुंबई •
गेली दोन वर्षे कोरोना महामारीचा कालावधी हा सर्वांसाठीच आव्हानात्मक होता विशेष करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या डॉक्टर तसेच परिचारिकांना खूप काही शिकवून गेला, कोरोनाशी दोन हात करताना अनेक डॉक्टर तसेच परिचारिकांना अनेक संकटाचा सामना करावं लागला होता याचीच दखल घेऊन रुग्णांची गुणवत्तापूर्वक काळजी कशी घ्यावी यावर नेरुळ येथील तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विशेष तज्ज्ञांच्या उपस्थितीत परिचारिकांना ऑनलाईन पद्धतीने विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
प्राचार्य सौ प्रतिभा अठारे, त्यांच्या सहकारी सोम्या मेनन , स्वाती चव्हाण, प्रियंका कदम मॅडम, जयश्री मिसाळ , महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, व नॅशनल हेल्थ अकॅडमी यांच्यावतीने डॉ. दिपाली उमाळे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

‘रुग्णांची उत्तम यशस्वी गुणवत्तापूर्वक देखभाल व काळजी’ या विषयावर देश-विदेशातील विद्याविभूषित परिचारिका व डॉक्टरांनी येथे सर्व सहभागी परिचारिकांना दूरस्थ पद्धतीने मार्गदर्शन केले. परिचारिका खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित असून ऐकूण १७८० देशविदेशातील परिचारिकांनी याचा लाभ घेतला. प्रोफेसर वैशाली तास्कंद या कार्यक्रमाचे अवलोकन करण्यासाठी एमएनसी कडून उपस्थित होत्या.या कार्यशाळेसाठी मिनिमोल वर्गीस मॅ, डॉ. नीलिमा भोरे, अनिज्मा (अमेरिका), डॉ. सुशीला कवाडे , डिनी मेलविन, डॉ. एलिजाबेथ जोसेफ, डॉ.पवन मित्तल, डॉ.शुभांगी जाधव यांनी हा विषय अधिक सोपा व सुलभ करून खूप उत्तम रित्या मार्गदर्शन केले.
या अशा कार्यशाळेमुळे या महामारी सारख्या काळात व इतर कुठल्याही वैद्यकीय आपत्तीच्या काळात देखील रुग्णसेवा ही उत्तम व दर्जेदार गुणवत्तापूर्वक पुरवण्यासाठी परिचारिका या नेहमीच सज्ज राहतील असे हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.








Be First to Comment