सोन्याच्या नारळाची प्रतिकृती विधिपूर्वक पूजाअर्चा करून समुद्राला अर्पण
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा नारळी पौर्णिमा सण या वर्षी कोरोना कोविड १९ महामारीमुळे अत्यंत साधेपणाने द्रोणागिरी हायस्कुल करंजा येथे साजरा करण्यात आला.
सोन्याच्या नारळाची प्रतिकृती करून त्याची विधिपूर्वक पूजाअर्चा करून सदर नारळ समुद्राला अर्पण केला.
यावेळी द्रोणागिरी हायस्कूल करंजा चेअरमन सिताराम नाखवा ,करंजा सोसायटी चेअरमन भालचंद्र नाखवा, चाणजे ग्रामपंचायत उपसरपंच प्रदीप नाखवा, मराठी माध्यम मुख्याध्यापक ए.टी . पाटील सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रभु मॅडम, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कल्पना पाटील, शाळेचे सदस्य सदाशिव गांगरे, देविदास थळी, अमृत म्हात्रे , सदस्या देवयानी कोळी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.











Be First to Comment