न्हावा शेवा CHA संघटनेच्या आधार चषकाचे शानदार आयोजन : २५ लाखांचा निधी जमा
सिटी बेल • उरण •
उरण तालुक्यात CHA चे अपघात होत असतात. अश्या अपघात ग्रस्त CHA च्या कुटूंबाला अपघात निधी मिळावा यासाठी या क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी निलेश म्हात्रे शेकाप युवा नेते, विनोद म्हात्रे काँग्रेस तालुका अध्यक्ष , प्रसाद पाटील सरपंच वशेणी, संतोष मोकल पो.पा. पिरकोन यांच्या शुभ हस्ते स्पर्धे चा शुभारंभ झाला.

स्पर्धेचा मूळ उद्देश अपघात निधी जमा होण्याचा असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यामध्ये माजी आमदार मनोहरशेठ भोईर , महेंद्रशेठ घरत काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष, ज्ञानेश्वर घरत जिल्हा परिषद सदस्य , वैजनाथ ठाकूर मा.जिल्हा परिषद सदस्य, संतोष ठाकूर शिवसेना उरण तालुका अध्यक्ष , महेश कडु माजी सरपंच सोनारी, सुनील कडू, सौ.विशाखा ताई ठाकूर सरपंच खोपटे , प्रशांत ठाकूर स्वराज्य ग्रूप अध्यक्ष खोपटे , कृष्णा पाटील दहा गाव माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष पिरकोन, सत्यवान भगत मनसे उरण तालुका अध्यक्ष, रुपेश पाटील शिवसेना उरण तालुका संघटक, निवास गावंड सर आवरे, मधू पाटील बहुजन पार्टी कांदिवली, श्रीमती निराबाई ठाकूर सरपंच आवरे, उद्योगपती विनायक पाटील, उद्योगपती अजित पाटील, उद्योगपती देवेंद्र पाटील, विपुल म्हात्रें उसरपंच कोप्रोली , अजित म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, सौ.करिश्मा कमलाकर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या खोपटे, पाटील ग्रा. सदस्य खोपटे, सौ.भावना म्हात्रें माजी सरपंच खोपटे, कैलास म्हात्रे सामाजिक कार्यकर्ता खोपटे, शामकांत पाटील मा.उपसरपंच सारडे, संदीप पाटील मा. सरपंच सारडे, नारायण तांडेल शाखाप्रमुख सोनारी, समाधान म्हात्रे उपसरपंच आवरे, धीरज ठाकूर शिवप्रेमी आश्या अनेक सामाजिक राजिकाय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मदतीचे हात पुढे करून या क्रिकेट स्पर्धेला मदतीचा हात दिला.
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील खोपटे गावातील धसाखोशी मैदान, येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उरण तालुक्यातील अपघातग्रस्त CHA बधूंच्या आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या CHA आधार चषकाला दरवर्षी खेळाडू, रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो.

न्हावा शेवा CHA संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष -हनुमान म्हात्रे, रुपेश भगत, दिनेश म्हात्रे, सल्लागार -बाळकृष्ण शेडगे, सुरेंद्र म्हात्रे, जनार्दन कडू, दिपक गावंड, सचिव शशिकांत ठाकूर, हरिष म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, खजिनदार -संदिप पाटील, किरण म्हात्रे, शैलेश पाटील,मिलिंद म्हात्रे, संघटक -संपेश पाटील, सचिन केदारी, जितेंद्र भगत, श्याम गावंड यांच्यासह CHA संघटनेचे सर्व सदस्यांनी या CHA आधार चषकाचे आयोजनात मोलाचं योगदान देऊन ही संघटना माझी आहे आश्या माझ्या भविष्यासाठी आहे यासाठी अपार मेहनत घेतली आहे.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा CHA संघटना ही उरण पवनेल नव्हे तर रायगड मधील जिल्ह्यातील एकमेव संघटना आहे.
मत मान्यवाराच्या तोडून प्रदर्शित झाली आहेत क्रिकेट क्षेत्रात या CHA संघटनेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे.या स्पर्धे तुन एक दिवशीय स्पर्धेतून २५००००/-रुपये निधीं जमा झाला आहे आणि तो अपघात निधी म्हणून वापरला जाईल आयोजना साठी येणारा सर्वच खर्च संघटनेचे प्रत्येक सभासदांनी आपल्या परिन योगदान दिले आहे. यातील एक ही रुपया आयोजना साठी वापरला जाणार नाही असे ठाम मत न्हावा शेवा सी.एच. ए. संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेचा प्रथम क्रमांचा मानकरी 1416 वाँरियर ठरला मालक मनोज पाटील तसेच दक्ष इलेनवन हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला त्यांनी ती रक्कम संघटनेत अपघात निधी म्हणून दक्ष इलेव्हन संघाचे मालक दिनेश पाटील,सुरेंद्र म्हात्रे यांनी जाहीर केले या स्पर्धे साठी
सुत्रसंचालन नितेश पंडित सर,सुनील वर्तक, गाताडी सर ,पंडित,सुशांत माळी,प्रवीण सर , शनीकुमार,राजेंद्र सर,तर गुण लेखन प्रितेश म्हात्रे, त्रिजन म्हात्रे यांनी केले.
आधार चषकासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मोहिंदर गावंड आवरे यांच्याकडून ,सामनावीर ट्रॉफी साई कृपा MS -CIT राकेश सर कोप्रोली यांच्याकडून, सामनावीर पुरस्कार म्हणून 2500/- किमती ची सन ग्लासेस कुंदन म्हात्रे गोवठणे यांच्याकडून ,मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रशांत म्हात्रे सामाजीक कार्यकर्ते खोपटे यांच्याकडून तसेच मॅन ऑफ द मॅच म्हणून खास आकर्षक टि -शर्ट इंटर पोर्ट ग्लोबल कंपनी कडून देण्यात आले.

खेळ आणि दुखापत यांचे एक प्रकारे नातेच असते यासाठी प्रथोमपचार पेटी निवास गावंड सर आवरे यांच्याकडून देण्यात आली. या स्पर्धेत पहिल खास आकर्षक देवांश येवला पैठणी अँड सिल्क साडी कोप्रोली तर्फे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून येणाऱ्या महिला भगिनींना खेळ पैठणी चा याचे मानकरी सौ.करिष्मा कमलाकर पाटील खोपटे ग्रामपंचायत सदस्य ह्यां ठरल्या
तर दुसरे बक्षीस महेश कडू माजी सरपंच सोनारी यांच्या संकल्पनेतुन मोबाइल लकी ड्रॉ आयोजित लकी ड्रा चा मानकरी महेश गावंड आवरे हें ठरले.
सर्व मान्यवाराचे आभार हे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी मानले शेवटी भावुक होऊन प्रेक्षकाचा आणि निधी देणाऱ्या मायबापाचा उदंड प्रतिसाद पाहून डोळ्यात अश्रू अनावर झाले.
आश्या प्रकारे संपन्न झाला निधी साठी आधार चषकाच आयोजन झाले.








Be First to Comment