Press "Enter" to skip to content

सरपंच कब्बडी चषक स्पर्धा

वडखळ सरपंच कब्बडी चषकाचा मानकरी ठरला मिनलाईट कर्जत संघ

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर कोळवे संघ आयोजित तसेच जेएसडब्ल्यु कंपनी डोलवी पुरस्कृत करण्यात आलेल्या सरपंच कबड्डी चषकाचा मानकरी मिनलाईट कर्जत संघ ठरला आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेएसडब्ल्यु कंपनीचे उच्च अधिकारी गजराज राठोड, जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबंडा, आत्माराम बेतकेकर, सीएसआर विभागाचे प्रमुख विनायक दळवी, वडखळचे सरपंच राजेश मोकल, माजी पंचायत समिती सदस्या पूजा मोकल, माजी सरपंच मनोहर कोळी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गजराज राठोड यांनी सांगितले की, अशा खेळांसाठी जेएसडब्ल्यु कंपनीचे नेहमीच सहकार्य लाभले असून या भागात अनेक उत्तम खेळाडू आहेत जे येणाऱ्या काळात राज्य स्तरावर जाऊन या भागाचे नांव उज्ज्वल करीत त्यामुळे अशा खेळाडूंच्या मागे कंपनी निश्चितपणे उभी राहणार आहे. तर सरपंच राजेश मोकल यांनी तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. या स्पर्धेतून एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचायला हवा हाच उद्देश आमचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मिनलाईट संघ कर्जत आणि ज्ञानेश्वर कोळवे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कर्जत संघ विजय ठरला असून द्वितीय संघ ज्ञानेश्वर कोळवे संघ ठरला तर तृतीय संघ मरी देवी धेरंड व चौथा गणेश क्लब उरण हे मानकरी ठरले.सदर विजेत्या संघांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व भव्य चषक तसेच सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.