रसायनीत बेकायदेशीर गावठी बनावटी कट्टा व काडतुसे हस्तगत
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
वडगाव येथील राजेंद्र मारुती जाधव (वय 43) याने विनापरवाना बेकायदेशीर सिंगल बोअर असलेला गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आपल्या ताब्यात बाळगल्या स्थितीत रसायनी पोलिसांना मिळून आली.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव येथील राजेंद्र मारुती जाधव याने वाशिवली येथील आपल्या दुकानाच्या गाळ्यात 15000 हजार किमतीची सिंगल बोअर असलेल्या गावठी बनावटीचा कट्टा त्याची नळी काळ्या रंगाची व बाॅडी पिवळसर धातूची तर ट्रिगर(चाप)व बाजूस घोडा असून तो चालू स्थितीत रसायनी पोलिसांना कारवाईत मिळून आला.

या गावठी कट्याचे बट, ट्रिगर व हॅमरवर लाल रंगाचा धागा गुंडाळलेला आहे. तसेच 3000 हजार रुपये किंमतीची पिवळसर धातुची दोन काडतुसे सापडली.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र मारुती जाधव यांच्या विरोधात भारताचा शस्त्र अधिनियम कलम 3,25 अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्याला शनिवार दि.2 रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, रसायनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.








Be First to Comment