Press "Enter" to skip to content

शिवसैनिकांचा सत्कार

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

रायगड जिल्हाधिकारी यांनी उरण तालुक्यातील विविध शासकीय समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये शिवसेनेच्या महिला तालुका संघटिका भावना कैलास म्हात्रे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिवसेना उरण शहराचे कासमभाट विभागाचे गटप्रमुख उमेश मारुती भंडारी यांची उरण तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेला या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुका संघटक बी एन डाकी,गटनेता गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक निलेश भोईर, महिला आघाडी पदाधिकारी श्रीमती सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, श्रीमती वंदना पवार, रझिया शेख, हुसेना शेख, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, सायरा खान, संजना कोष्टी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.