Press "Enter" to skip to content

जासई काँग्रेसतर्फे महापुजेचे आयोजन

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे आमदार व्हावेत : भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर

सिटी बेल • जासई • विठ्ठल ममताबादे •

सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जासई काँग्रेस कमिटीतर्फे सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजे निमित्त भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर यांच्या शुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला.त्यांची कन्या मिनल पाटील व नातू कु.गंधर्व पराग शहाबाजकर यांनी त्यांची साथ दिली.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांचा जासई काँग्रेस कमिटीतर्फे महादेवबुवा शहाबाजकर यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना महादेव बुवा शहाबाजकर म्हणाले की, सर्व सामान्यांची जाण असणारे व शून्यातून विश्व् निर्माण करणारे महेंद्रशेठ घरत हे जिल्हाध्यक्ष झालेत तसेच एकवेळ आमदार व्हावेत व भविष्यात होतीलच !

या महापूजेसाठी रायगड काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे,खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारिंगे, मा. जि. प. सदस्य डॉ. मनिष पाटील, पनवेल पं. स. माजी उपसभापती वसंत काठावले, रायगड युवक अध्यक्ष निखिल ढवळे, फिशर मेन संघटनेचे कोकण अध्यक्ष मार्तंड नाखवा, पनवेल शहर जिल्हा ओ. बी. सि. सेल अध्यक्ष वैभव पाटील, उरण विधानसभा युवक अध्यक्ष रोहित घरत, रायगड काँग्रेस महिला उपाध्यक्षा संध्याताई ठाकूर,उरण तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत,जासई विभागीय अध्यक्ष विनोद पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रमेश पाटील, संजय ठाकूर, यशवंत घरत, विवेक म्हात्रे, आदित्य घरत यांचे कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.