Press "Enter" to skip to content

अपंगावर मात करत यशाला गवसणी

मुरूड तालुक्यातील पी.एन.पी.माध्यमिक शाळा काकलघर महालुंगे या शाळेतील कु.प्रतीक्षा दत्ताराम रामाणे हिला इयत्ता दहावी मध्ये 78.40 टक्के गुण

मुलीसाठी आईवडिलांची धडपड

सिटी बेल लाइव्ह / मुरूड / विकास मेहेतर #

बालपणापासून नशिबी आलेल्या अपंगत्वावर मात करून आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत वांदेली गावातील प्रतीक्षा दत्ताराम रामाणे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावी मध्ये 78.40% टक्के गुण मिळवत यशाला गवसणी घातली आहे .
तिच्या जन्माची कहाणी अशी आहे की, जन्मतःच तिला उभं राहतं येत नसून कमरेपासून तिला लुकेपणा आहे ती दोन पायावर पायावर उभी राहू शकत नाही . तिचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण रा.जी.प. शाळा वांदेली येथे झाले. पुढील शिक्षणासाठी तिला 3 किलोमीटर अंतरावरील रा. जी.प. शाळा महालुंगे येथे पाचवी ते सातवी पर्यंत जावे लागले . पुढील शिक्षण इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत पी.एन.पी. माध्यमिक शाळा काकलघर येथे झाले. गेली 6 वर्ष तिच्या आईने तिला खडतर रस्त्याने व्हील सायकलवरून दररोज सकाळी आणि संध्याकाळी ने आन केले . तिच्या आईची वडिलांची शिकविण्याची जिद्द आणि त्या जिद्दीचे तसेच तिच्या कष्टाचे तिने सोन्यात रूपांतर केले. तसेच शाळेतील शिक्षकांनी सुद्धा तिच्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घेऊन वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन पालन करून जे घवघवीत यश मिळविले त्यामुळे शाळेतील मुख्यध्यापिका मा.सौ.वंदना वसंत मेहेतर तसेच शिक्षवृंद, व शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच श्री कालभैरव श्रमिक मित्र मंडळ वांदेली व वांदेली ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.