Press "Enter" to skip to content

कारवाई करण्याची सत्य सामाजिक संस्थेची मागणी

उरण चा शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांवीना सुना सुना

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण चारफाटा येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. विविध पशु पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या देखभालीसाठी चारफाटा उरण येथे जनावरांचे हॉस्पिटल कार्यरत आहे. मात्र येथील शासकीय कर्मचारी वेळेत कामावर हजर होत नाहीत. त्यामुळे जे शासकीय अधिकारी वेळेत कामावर येत नाहीत त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सत्य सामाजिक संस्था उरण, महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय दवाखाना चारफाटा उरण येथे अनेकदा कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा खूपच उशिरा म्हणजे सकाळी 9.00 चे वेळ असताना सकाळी 10.30/11.00 नंतर येतात. डॉ सोमनाथ भोजने हे या पशु वैद्यकीय दवाखाण्याचे डॉक्टर आहेत.हे कधीच वेळेवर कामावर हजर नसतात याची माहिती सत्य सामाजिक संस्थेला वारंवार मिळत होती. म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अचानक सकाळी दवाखाना उघडण्याच्या वेळी भेटी दिल्या असता मिळालेली माहिती सत्य असल्याचे निदर्शनास आले व पुरावा म्हणून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुद्धा करून ठेवलेल्या आहेत.

विविध सबळ पुराव्याच्या आधारे सत्य सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार पशुधन अधिकारी डॉ.अनिल धांडे, पंचायत समिती उरण यांच्याकडे केल्या होत्या. परंतु डॉ अनिल धांडे यांनी दिलेल्या दोन तक्रार अर्जावर काहीही कारवाई केली नाही. तसेच केलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई केली याची विचारणा करण्यास डॉ अनिल धांडे याना फोन केले तर नंतर फोन करतो हे सांगून फोन करीत नाहीत व कारवाईही करीत नाहीत. परंतु तिसऱ्यांदा डॉ सोमनाथ भोजने हे उशिरा येताना आढळले म्हणून पुन्हा डॉ अनिल धांडे याना फोन करून विचारणा व माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु डॉ अनिल धांडे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

वारंवार शासकीय कर्मचारी उशिरा दवाखान्यात येतात याबाबत लेखी तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आम्ही मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिरीष ठाकूर यांनी दिली.विशेष म्हणजे शासकीय डॉक्टर्सना दवाखान्याच्या इमारतीत राहण्यास खोल्या आहेत व नियम असूनही हे डॉक्टर्स येथे किंवा उरण मध्येही वास्तव्यास नसतात. हे सरळ सरळ शासकीय नियमांचे उल्लंघण आहे. याबाबत तक्रार करूनही डॉ अनिल धांडे हे डॉ सोमनाथ भोजने यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यामागे मुख्य दोषी हे डॉ अनिल धांडेच आहेत. कारण तेच स्वतः वेळेवर हजर नसतात. त्यामुळे अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सत्य सामाजिक संस्थेने उचलून धरली आहे.

तसेच पंचायत समिती उरण चे पशुधन अधिकारी डॉ अनिल धांडे, पशु वैद्यकीय दवाखाण्याचे डॉ. सोमनाथ भोजने हे संपूर्ण शासकीय कार्यालयीन वेळेत स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करीत असतात. हे डॉक्टर्स अंदाजे महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये प्रायव्हेट प्रॅक्टिस मधून मिळवीत असण्याची शक्यता संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे. म्हणून डॉ अनिल धांडे यांच्या एकूण मालमत्तेची चौकशी करण्यात यायला पाहिजे.तसेच दवाखान्यात सरकार कडून येणाऱ्या औषधांचे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असण्याचे दाट संशय संस्थेने व्यक्त केली आहे.

या संदर्भात अनिल धांडे पशुधन विकास अधिकारी, पशु संवर्धन विभाग पंचायत समिती उरण यांना विचारले शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहावे यासाठी लेखी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे अनिल धांडे यांनी सांगितले.

डॉ सोमनाथ भोजने यांना तीन वेळा रंगेहाथ पकडूनही व तसे व्हिडिओ रेकॉर्डिंगस असून ही तसेच त्यांच्याच वरिष्ठांनी या संदर्भात लेखी सूचना देऊनही या तक्रारी बाबत डॉ सोमनाथ भोजने यांना विचारले असता आम्ही वेळेवर कामावर येतो असे सांगितले. मात्र डॉ सोमनाथ भोजने उशिरा कामावर येतात व यांना पाठीशी घालण्याचे काम पशुधन अधिकारी अनिल धांडे करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व तसे व्हिडीओ रेकॉर्डिंगस सुद्धा संस्थेकडे आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.