मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील यांचे नेतृत्व
सिटी बेल लाइव्ह / उलवे #
उलवे परिसरात अव्वाच्या सव्वा वाढीव विजबिले येत असल्याने तसेच बिलं भरूनही वाढीव बिले आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.यामुळे शेकाप आक्रमक झाली असून, वाढीव बिलाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर शेकापच्या माध्यमातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
वाढीव वीज बिलांविरोधात शेकापच्या माध्यमातून राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उलवे येथील कार्यालयावर शेकापने धडक दिली.महावितरण कंपनी कडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत शेकाप ने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित विज बिले पाठवावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये अशी मागणी यावेळी शेकाप कडून करण्यात आली.
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंता अविनाश राठोड यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.
याप्रसंगी शेकाप माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment