Press "Enter" to skip to content

भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संध्या ठाकूर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यात भेंडखळ ग्रामपंचायत ही एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे. सध्या या ग्रामपंचायत मध्ये सरपंच व 11 विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कार्यरत आहेत. या नावाजलेल्या भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी संध्याताई दिपक ठाकूर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड विद्यमान सरपंच भाग्यश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, खजिनदार नरेश म्हात्रे यांनी संध्याताई ठाकूर यांना शुभाशीर्वाद दिले आहेत.सरपंच भाग्यश्री चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुचिता ठाकूर, योगिता ठाकूर, सोनाली ठाकूर, नीलम भोईर, नीता ठाकूर, स्वाती घरत, किशोर ठाकूर, रतन ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, काँग्रेस पक्षाचे उरण तालुकाध्यक्ष रेखाताई घरत, उपाध्यक्ष निर्मला पाटील,युवक उरण तालुका उपाध्यक्ष लंकेश ठाकूर,शहर उपाध्यक्ष चंदा मेवाती, शहर महिला अध्यक्ष श्रीमती अफसा मुकरी, सेवादल उपाध्यक्ष वंदना चव्हाण, रायगड जिल्हा महिला काँग्रेस सरचिटणीस सीमा ठाकूर, जेष्ठ कार्यकर्ते दिपक ठाकूर, सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत, केगांव अध्यक्ष सदानंद पाटील, जेष्ठ नागरिक वामन ठाकूर, काँग्रेस तालुका सेक्रेटरी नसीकेत म्हात्रे, महेश ठाकूर, महेश म्हात्रे,संगीता म्हात्रे,कैलास म्हात्रे,रविंद्र पाटील आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच संध्याताई ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

संध्या दिपक ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्त्या असून 1987 पासून ते आजपर्यंत ते सतत निवडून येत आहेत. गेली 30 वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत मध्ये सरपंच, प्रभारी सरपंच म्हणून कारभार सांभाळला आहे. प्रशासकीय कामाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.