सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग #
अलिबाग जवळील थळ गावचे मध्यमवर्गीय कुटुंबातील संकेत साळुंखे गेले 3 वर्ष सलग आपल्या वाढदिवस न चुकता सामाजिक कार्य करत आहे.
रूक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल, गरीब मुलांना खाऊ वाटप तर रुग्णालयात फळ वाटप असे विविध उपक्रम राबवित असतात.
ह्या वर्षी कोरोना या विषाणू च्या महामारी ने पूर्ण जग त्रस्त झाले आहे अश्या परिस्थिती आपल्या गावातील लोकांना सामाजिक कार्यकर्ते संकेत साळुंके यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून
दत्तात्रय थळे , निलेश भाऊ पाटील ऍड महेशजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आज थळ गावातील लोकांना घरो घरी जाऊन आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचं जवळपास 500 बॉटल चे वाटप करण्यात आले.






Be First to Comment