सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
मोहोपाडा येथील श्रीपाद हॉस्पिटल येथे नुकतेच समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने टीम चॅलेंजर्सने आरोग्य चिकित्सा शिबिरअंतर्गत आयुर्वेदिक सांधेदुखी तपासणी करण्यात आली. यावेळी, मोहोपाडासह रिस, कांबा, चांभार्ली, वावेघर, पेण, खोपोली, जोहे, गोवठणे, कैरे, रसायनी येथील जवळपास ८० जणांनी तपासणी करून घेतली.
वाढत्या वयामुळे अनेकांना सांधेदुखीसारखे आजार जडतात. त्यावर अनेक उपचार केले जातात. मात्र, इलाज न झाल्याने बेजार होतात. त्यासाठी आयुर्वेदिक उपाय योग्य असल्याचे डॉक्टर सांगतात. याच पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी, पुणे येथील डॉ. भारत राठोड, डॉ. संजय म्हात्रे, डॉ हनुमंत खामकर, राम झोडगे, केशव खेडकर, अजित चव्हाण, निवेदिता कोंडीलकर, कविता पाटील, जनार्दन मोकल, मुकेश पटेल, राजेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment