दिघोडे सरपंच सौ सोनिया मयूर घरत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रमनुकताच अलिबाग येथे संपन्न झाला. यावेळी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सोनिया मयूर घरत यांना रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते दैनिक नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२ अंतर्गत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सोनिया मयूर घरत यांनी ग्रामपंचायत मध्ये विविध आदर्शवत विकासकामे करत गावांचा विकास साधला आहे त्यांनी गावांमध्ये विकासकामे करण्यावर भर दिला आहे.
त्याचबरोबर कोरोना काळात जनजागृती, अन्न धान्य वाटप, लसीकरण मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली , तसेच विविध विकासकामे करून त्यांनी आदर्श काम केले आहे, त्यामुळे त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.








Be First to Comment