ओएनजीसी गेट समोरील म्हातवली ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडला आग
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
दिनांक 26/3/2022 रोजी रात्री अंदाजे 9 च्या सुमारास उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनीच्या एपीयु गेट समोरील म्हातवली ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडला अचानकपणे आग लागली. आगीने एकच भडका घेतला. मात्र ओएनजीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेचच आग विझविली. व आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हातवली ग्रामपंचायत व ओएनजीसी कंपनी प्रशासनाने एकत्र येत या डम्पिंग ग्राउंडचा गांभीर्याने विचार करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ओएनजीसी कंपनी परिसर व म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वी आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
येथे आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे म्हातवली ग्रामपंचायत व ओएनजीसी प्रशासनाने या परिसरात आग लागू नये यासाठी विशेष पाऊले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.








Be First to Comment