Press "Enter" to skip to content

श्री समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्था उरणच्या वतीने

महिलांकरिता विनामूल्य ई-श्रमकार्ड कॅम्पला उत्तम प्रतिसाद

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण येथील श्री समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगिताताई सचिन ढेरे यांच्या वतीने उरण शहरातील देऊळवाडी शंकर मंदिर येथे महिला भगिनीं करिता मोफत ई-श्रमकार्ड बनवून देण्यासाठीच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सहकार्यातून आणि संगिताताई ढेरे यांच्या वतीने आयोजित मोफत ई-श्रमकार्ड बनवून देण्यात येणाऱ्या कॅम्प मध्ये ई- श्रमकार्ड बनवून घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी आपली उपस्थिती दर्शविली.तब्बल 85 च्या वर महिला भगिनींनी ह्या कॅम्प मध्ये आपली मोफत ई- श्रमकार्ड बनवून घेतली.

श्री समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगिताताई ढेरे यांच्या वतीने ह्या मोफत ई- श्रमकार्ड काढून देण्याच्या कार्यक्रमा करिता रायगड भूषण राजू मुंबईकर,ई- सेवा केंद्र चालक आणि सामाजिक कार्यकर्ते अभयजी ठाकूर, अनिलजी घरत सोबतच या कार्यक्रमात उपस्थित समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या खजिनदार मंजू राकेश कुमार, सदस्या पूजा प्रसादे,सुप्रिया सरफरे,कविता म्हात्रे,ईशानी शिंदे ,अभया म्हात्रे, वैशाली कुंदप,तृप्ती भोईर,साहिल प्रसादे अनघा ठाकूर ,वैदेही वैवडे ,वैशाली पाटील,शीतल ठाकरे आदींनी खास मेहनत घेतली.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उदंड प्रतिसादात संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.