भेंडखळ येथे दिनांक 29 मार्च रोजी हार्ट अटॅक संबंधित सर्व चाचण्या मोफत
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
हार्ट अटॅक आणि हार्ट संदर्भातील समस्या वेळीच समजल्या तर त्यावर उपचार करून मात करणे सहज शक्य आहे. मात्र यासाठी कराव्या लागणाऱ्या प्राथमिक चाचण्या हया खर्चिक असल्याने सर्वसामान्य लोक याकडे गांभीर्याने पहात नाहीत.
हाच धागा पकडून पालवी सामाजिक संस्था तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल, नविन पनवेल यांच्या सहकार्याने या सर्व चाचण्या सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
यासाठी पालवी सामाजिक संस्था, विजय-विकास सामाजिक संस्था, नवतरुण मित्र मंडळ आणि सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल डॉक्टर राजेंद्र शिरसागर (CMO),कॅम्प व्यवस्थापक रत्नमाला पाबारेकर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 29 मार्च 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडखळ येथे “मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात, ऑक्सिजन लेवल,वजन, रक्तदाब, ई. सी. जी.,2D ईको,रॅंडम ब्लड शुगर टेस्ट, एक्स रे, टी. एम. टी आदी चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.
तसेच ज्यांना एन्जीओग्राफी करण्याची आवश्यकता लागत असेल तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांची एन्जीओग्राफी मोफत करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा आणि विशेषतः 40 वर्षावरील नागरीकांनी आपली वैद्यकीय तपासणी आवश्य करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








Be First to Comment