सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कोंढरीपाडा समुद्रकिनारी संरक्षण भिंतीचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
चाणजे ग्रुपग्रामपंचायतचे वॉर्ड क्रमांक सहाचे विद्यमान सदस्य अमितजी भगत यांच्या मागणीनुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पुढाकाराने बाबदेवपाडा ते कोंढरीपाडा येथील समुद्रावरील रस्त्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे उद्घाटन नुकतेच कोंढरीपाडा येथे पार पडले आहे.
चाणजे ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक सहा मधील बाबदेवपाडा ते कोंढरीपाडा येथील समुद्र किनार्यावरील रस्त्यावर येणाऱ्या समुद्राच्या लाटा या पासून सरंक्षण व्हावे यासाठी सरंक्षण भिंतीची आवशक्यता होती हि बाब लक्षात घेऊन माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या माध्यमातून सरंक्षण भिंतीच्या कामाचे उघ्दाटन चाणजे ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच मंगेश थळी तसेच तालुका उपसंघटक सदस्य अमितजी भगत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हाञे, कोंढरीचे अध्यक्ष करण भोईर, जेष्ठ नागरिक माणिक पाटील, शंकर भोईर, रामदास पाटील, महादेव भोईर, रामनाथ पाटील, भालचंद्र ठाकूर, दत्ताराम भोईर, रघुनाथ पाटील, प्रकाश म्हाञे, तेजेश पाटील,सूरज कोळी, उपशाखाप्रमुख राजू पाटील आदि मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment