Press "Enter" to skip to content

बेघर कुटुंबाला घरगुती सामान भेट

स्वातीताई पाटील यांनी वाढदिवसाचा अनोखा आदर्श ठेवला सर्वांसमोर

सिटी बेल • वशेणी • शशिकांत ठाकूर •

आभाळ फाटलं, हा हा म्हणताच क्षणभंगुर सारे एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.. आपलं घर आपल्या समोर जळतांना पाहण या पेक्षा दुर्दैव हे कुणाच्या नशीबी येऊ नये ! काही दिवसांपूर्वी वशेणी येथील समीर गावंड दाम्पत्याच घर हे आपल्या नजरे समोर जाळून खाक झालं आणि क्षणात होत्याच नाही झालं. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ‌

या कुटुंबातील सर्वाना एक आधार म्हणून विशेणी गावाचे माजी सरपंच प्रसाद पाटील यांच्या पत्नी सौ स्वातीताई पाटील यांनी आपला वाढदिवस हा अनोख्या पध्दतीने एक सामाजिक हित पाहून साजरा केला. बेघर कुटुंबाला घरगुती सामान म्हणजे सर्वप्रकारची घरगुती भांडी देऊन स्वाती ताई यांनी एक वाढदिवसाचा आदर्श सर्वसमोर घरगूती भांडी भेट दिली.

हे मांगल्याचे प्रतीक होय हे पाहून कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या संकल्प पूर्ती प्रसंगी सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली MSCIT चे राकेश पाटील सर ,सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर कार्याध्यक्ष रोहित पाटील , शशिकांत ठाकूर हरिष म्हात्रे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.