सिटी बेल लाइव्ह / रमेश थळी / उरण #
शेतकरी कामगार पक्षाचा ७३वा वर्धापनदिन शेकापचे जेष्ठ नेते का. का. पाटील यांच्या पाटील वाडीत मांडल आली येथे आज २आॉगष्ट २०२० रोजी सुरक्षित अंतर राखून साजरा करण्यात आला.
या वर्षी देशात कोरोना रोगाचा पादुर्भाव असल्यामुळे शेकापचे वरिष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार यावर्षी तालुक्यातीत गावा गावातील पदाधीकारी यांनी साजरा केला.
या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ट दिवंगत नेते कै ना ना पाटील यांना श्रदांजली वाहून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती अॅड. सागर कडु, अॅड. प्रदीप पाटील, अॅड. नयना पाटील, पं स माजी सदस्या सौ माया पाटील, जि प माजी सदस्य चारुदत्त पाटील, प स माजी सदस्य जीवन गावंड, विभाग चिटणीस भारतराज थळी उपस्थित होते. या प्रसंगी का का पाटील यांनी शतकरी कामगार पक्षाचे नागावातील शिल्पकार नाना पाटील यांनी नागावात शेतकरी कामगार पक्ष कसा वाढवला याची माहीती सविस्तर पटवून देत पुढे म्हणाले की, आज माझे बंधू आज आपल्यात नसले तरी त्यांचे पक्ष वाढविण्या फार मोठे योगदान आहे आपण त्यांनी आपल्याला दिलेली पक्षाची धोरणे तरूणांनी या पढे घराघरात रूजवणे ही प्रत्येकाची जबादारी आहे. हे कार्य केले तरच आज ना ना पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या प्रसंगी सागर कडू, जीवन गावंड, चारुदत्त पाटील यांनी विचार मांडले या कार्यक्रमात पं स उप सभापती शुभांगी पाटील, शहर अध्यक्षा नयना पाटील पं जीतेंद्र ठाकुर,हरेश्वर थळी,जनार्धन थळी किरण मांदारकर,प्रकाश पुरो, भूषण पाटील कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment