उरण नगर पालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कातकरी आदिवासी बांधवांना कामावरून काढून टाकण्याचा अमानुष प्रकार
किमान वेतन मागितल्यामुळे सुड बुद्धीने कारवाई केल्याने सर्वत्र असंतोष, उद्या पासून करणार काम बंद आंदोलन
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
काही दिवसांपूर्वी किमान वेतन देण्यात यावे याकरिता सर्वांनी मिळून मागणी केली होती. हे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्त, पनवेल यांचे कडे प्रलंबीत आहे/ न्याय प्रविष्ट आहे. या सर्वाबाबत राग मनात धरून उरण नगर पालिकेच्या हे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या काॅंट्रॅक्ट कंपनीचा ठेकेदार याने तडका फडकी एकाधिकारशाहीने दहा सफाई कामगार यांना कामावरून काढून टाकले. हे काढून टाकलेल्या कामगारांमध्ये गेली तीस वर्षांपासून काम करणाऱ्या कातकरी आदिवासी महिला देखील आहेत.

वर्षानुवर्षे घाण साफ करण्याचे काम करत असलेल्या ह्या महिलांनी कधी स्वतः च्या आरोग्याची परवा केली नाही परंतु आपल्या सारख्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली कोवीड मध्ये केलेले काम तर कोणीही विसरूनच नये. त्यांच्यावर ही उपसमरीची वेळ येणे हे दुर्दैवी गोष्ट आहे. एकीकडे जिल्हाधिकारी साहेब कातकरी लोकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि दुसरीकडे एक स्वार्थी ठेकेदार माणूस त्यांना रस्त्यावर आणु पाहतोय.
खरं तर ह्या प्रकरणात मुख्याधिकारी उरण नगर परिषद यांनी पालक संस्था म्हणून लक्ष घालून विषय सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. एखाद्या व्यक्तीने किमान वेतन याची मागणी करणे हे भारतीय संविधानाने त्याला दिलेला अधिकार आहे. मुख्याधिकारी साहेब यांनी मागेच एक महिन्याच्या आत किमान वेतन दिले जाईल असे मान्य केले होते.
कातकरी आदिवासी आणि गोर गरीब कामगारांना कामावरून काढून टाकल्याने असंतोष पसरला असून उद्या सकाळी दहा वाजता उरण नगर पालिकेच्या गेट समोर बसून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांना घ्यावा लागला आहे. तसे पत्र उरण पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.

आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या उरण सामाजिक संस्थेने आंदोलनास पाठिंबा दिला असून त्यात सक्रिय सहभागी होणार आहेत. मान जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर साहेब यांनी वरील विषयात लक्ष घालून वेळीच तोडगा काढून सर्व सफाई कामगार यांना कामावर कायम ठेवून कातकरी आदिवासी आणि गोर गरीब बांधवांवर होणारा अत्याचार थांबवावा
– प्रा राजेंद्र मढवी
उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था








Be First to Comment