Press "Enter" to skip to content

शिवमय वातावरणात पालखी

“जाणता राजा” कला सांस्कृतिक व सामाजिक गृप केळवणे आयोजित शिवजयंती व शिवछत्रपती पालखी सोहळा संपन्न

सिटी बेल • केळवणे • अजय शिवकर •

केळवणे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे सोमवार २१ मार्च रोजी शिवजयंती महोत्सव व पालखी सोहळा “जाणता राजा” कला सांस्कृतिक व सामाजिक गृप यांच्या वतीने शिस्तबद्ध व शासकीय नियमांचे भान ठेवून हर्ष व मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात शिवभक्तांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साह व आनंदात शिवजन्मोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ९ वाजता शिवछत्रपतींच्या अश्वरुढ स्मारकाच्या अभिषेक व पुजनाने सुरू झाली, तसेच १० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपतींचे पुजन व पुष्पवर्षाव करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी आमदार मनोहर शेठ भोईर, सरपंच अश्विनी संदीप घरत, उपतालुका प्रमुख डॉ. भरत जाणू घरत , स्वीय सहायक दत्तात्रेय धर्माजी कडू, सुरज ज्ञानेश्र्वर घरत युवा कार्यकर्ता, विनायक गावंड युवा कार्यकर्ता, मारुती हसुराम मोकल- सदस्य, गुरुराज ठाकूर सदस्य, सुशील ठाकूर सदस्य, मुक्ता माळी सदस्य, जयश्री कोळी सदस्य, गावातील शिवभक्त, आणि ग्रामस्थ मंडळ
आदी मान्यवर व ग्रामस्थांनी भाग घेतला.

तसेच विशेष पाहुण्यांच्या हस्ते भगव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले व त्या नंतर सर्व शिवभक्त व ग्रामस्थ मिळून सद्गुरु हसूराम बाबा माउली मुक्त सांप्रदायिक भजन मंडळ यांच्या समवेत भजन करत पालखी मिरवणूक सोहळा अतिशय शिस्तबद्ध व काटेकोरपणे नियमांचे पालन करून उत्साह व आनंदाने पार पाडण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.