सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा शहरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सेवाभावी वर्गमित्राची संघटना असलेल्या आम्ही रोहेकर फाऊंडेशन तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे रुग्णांची गरज लक्षात घेत रुग्णांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना सारख्या महामारी मध्ये सामाजिक बांधिलकी राखत आम्ही रोहेकर फाऊंडेशनच्या वतीने रुग्णांची व रुग्णालयाच्या व्यवस्थपणाची गरज लक्ष्यात घेत १०० बेडशीट, १०० पिलोकवर ४० मास्क, बिस्कीट, पाणी बॉटल आदी साहित्याचे वाटप रोहाच्या डॉ. अंकिता खैरकर यांच्याकडे सुपूर्द केले.
आम्ही रोहेकर फाऊंडेशचे अध्यक्ष
संदीप जैन यांच्या मार्गदर्शना खाली ही संस्था अनेक सामाजिक कार्य करीत आहे.
या प्रसंगी रोहाचे नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे,नगरसेवक महेंद्र गुजर, नगरसेवक राजेंद्र जैन,अध्यक्ष संदिप जैन, विलास गुजर,महावीर जैन,सुरेंद्र जैन,प्रसाद देशमुख, किरण पाटील,श्रद्धा साळुंखे, शर्मिला परब,आशिष शहा,राजीव शहा,महेश पुननिया व आम्ही रोहेकर फाऊंडेशचे सर्व सदस्य तसेच रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.






Be First to Comment