Press "Enter" to skip to content

लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी तर्फे 500 झाडांचा लागवडीचा संकल्प

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. आणि वातावरणातील बदलामुळे येत्या काही दिवसांत अधिक गरमीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी उरणच्या आजूबाजूच्या परिसरात 500 झाडांची लागवड लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने फळांचा राजा आंब्याचा हंगामही सुरू झाला आहे.आंबे खांल्यानंतर बिया फेकून देऊ नका, पाण्याने स्वच्छ धुवा आणि सर्व बिया एका कॅरी बॅगमध्ये गोळा करा आणि आम्हाला द्या. (तुम्ही आम्हाला रोप सुद्धा देऊ शकता)आम्ही त्या सर्व बियांचे नियोजन करू आणि ते वृक्षारोपणाच्या दिवशी लावू.केवळ झाडे लावणेच नाही तर आपल्या भविष्यासाठी त्यांचे जतन करणे हा आमचा उद्देश आहे.चांगल्या पर्यावरणासाठी हे आमचे एक पाऊल आहे आशा आहे की तुम्ही सर्व आम्हाला मदत कराल.असे नम्र आवाहन अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी नागरिकांना केले आहे.

अधिक माहितीसाठी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे अध्यक्ष संदीप म्हात्रे 98211 42202,
भूमिका सिंग-98675 77669,
मोनिका चौकर -9226208625,
सुषमा काळे -8291446203 यांच्याशी तसेच लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या पदाधिकारी, सदस्यांशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.