वीर वाजेकर महाविद्यालय जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात संपन्न…
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम व बी एम एस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्ताने पोस्टर मेकिंग व बिझनेस आयडिया या प्रकारातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.सदर स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी.पवार यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी विद्यार्थिनी मिताली भोईर, योगिता सैनि,अग्निशा कडू,राज घरत यांनी ग्राहक हक्काची जाणीव करून देणारी भाषणे केली.

रितेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले .प्रतीक्षा बरकडे हिने उपस्थितांचे स्वागत केले.विनिता कोळी हिने आभार मानले. प्रा. भूषण ठाकूर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस बी ओहोळ यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रियांका ठाकूर, प्रा. दिपाली पाटील प्रा. दिक्षिता मात्रे प्रा.प्रांजल भोईर प्रा.राजेंद्र थोरात यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रा. विश्वजित कोळी,डॉ. झेलम झेंडे,डॉ. विद्या नावडकर, प्रा.संतोष देसाई यांनी परीक्षक म्हणून काम केले.यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास महाले,प्रा. माऱ्याप्पा सोणवले,प्रा. राम गोसवी,प्रा.संदीप घोडके , सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.








Be First to Comment