सर्वसामान्य मुलांना इंग्रजी शिक्षणाचे दालन उघडण्याचे प्रमाणिक प्रयत्न :- मधुकर पाटील
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यात नामवंत इंग्रजी शिक्षण संस्था आल्या परंतु या शाळा सर्व सामान्याना परवढणार्या नव्हते.या शाळांची फी जास्त होती.त्यामुळे गोरगरिबांची मुले इंग्रजी शिक्षण शिकणार कुठे असा प्रश्न होता. कमीत कमी फी दर्जेदार इंग्रजी शिक्षणासाठी एम.बी.पाटील इंग्लिश स्कूल रुपी सर्वसामान्य मुलांना इंग्रजी शिक्षणाचे दालन उघडण्याचे प्रमाणिक प्रयत्न केल्याचे सांगत २००७ सारी ७ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सूरू केलेली शाळा आज १६ वर्ष दर्जेदार इंग्रजी शिक्षण विद्यार्थी घेत असल्याचे एम.बी.पाटील स्कुलचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समारोप प्रसंगी व्याक्त केले.

यावेळी देशपांडे सर, ग्रामसेवक अशोक गुट्टे, मुख्याध्यापिका देसाई मॅडम,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी देशपांडे सर यांनी या शाळेची गुणवत्तेची परंपरा याही वर्षी कायम राहाणारे असून विद्यार्थ्यांनी भविष्यात या शाळेचे नाव उज्ज्वल करतील असे सांगितले.यावेळी उपस्थित शिक्षकांनी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना चांगले दर्जाचे शिक्षण मिळेल असे ही सांगितले.








Be First to Comment