सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १४ जण सापडले तर ७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज एकूण पॉझिटीव्ह ९०१, उपचार करून बरे झालेले ६९८, उपचार घेणारे १७३, मयत ३० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज नाईक नगर झोपडपट्टी १, नागाव ५, डोंगरी १, रांजणपाडा १, नागाव उरण १, बोरी उरण १, नागाव पिरवाडी १, करंजा नवापाडा १, जेएनपीटी १, मोरा कोळीवाडा १ असे एकूण १४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर जसखार २, सोनारी १, उरण २, जासई २ असे ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
उद्या भाऊ बहिणींचा पवित्र असा रक्षाबंधन सण आहे. तरी सर्वानी हा सण कोरोनाची वाढती भीती लक्षात घेत साजरा करावा.






Be First to Comment