Press "Enter" to skip to content

21 मार्च ला तेरापंथी हॉल उरण येथे

शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे आयोजन

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

तिथी नुसार शिवजयंती उरण मध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या शिवजयंती निमित्त उरणमध्ये प्रथमच मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे शिवकालीन पर्वातील प्रत्यक्ष लढाईत वापरण्यात आलेले शस्त्र व पेशवाई काळातील नाणी प्रत्येक नागरिकांना, शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी उरणमध्येच सोमवार दि 21मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत तेरापंथी हॉल, वाणीआळी, उरण शहर येथे उपलब्ध होणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी या इतिहासाचे साक्षीदार व्हावेत, या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर यांनी सर्व उरणकरांना केलेले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.