कशेडी घाटामध्ये बर्निंग कार चा थरार…
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
तालुक्यातील कशेडी घाटाच्या दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील उतारावर गुजरात राज्यातील एक कुटुंब असलेली कार सकाळी उन्हाचा तडाखा वाढला असताना जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कशेडी टॅपच्या हद्दीत सरस्वती मंदिराजवळ रेनॉ डस्टर कार (जीजे05जेएफ0022) कशेडी घाटातून घेऊन जाणारे चालक विजय अनंत कदम (वय43, रा. अमरोली, सुरत गुजरात) हे आपली पत्नी मीना कदम व मुलगा विव्हान कदम असे मुंबई ते टेरव चिपळूण असा प्रवास करीत असताना डस्टर कारने अचानक पेट घेतल्यामुळे संपुर्ण कार जळून खाक झाली.
या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून कारमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. फायर ब्रिगेड खेड नगरपालिकेच्यामदतीने कारला लागलेली आग विझवण्यात आली. वाहतूक सुरळीत चालू ठेऊन इतर प्रवाशांनी कारमधील प्रवाशांना बाहेर काढून सुखरूप ठेवले.
यावेळी कशेडी टॅप उपनिरीक्षक चांदणे, एएसआय बोडकर, पोलीस हवालदार धोपावकर, पोलीस नाईक दुगावले, चिकणे व खेड पोलीस स्टेशन पोलीस हवालदार मोरे यांनी तातडीने मदत केली.








Be First to Comment