Press "Enter" to skip to content

उरण शहरात कार्यक्रम

“सूर उरणकरांचा” ग्रुप तर्फे स्व.लता मंगेशकर यांना स्वर सुमनांजली अर्पण

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, विमला तलाव, उरण शहर येथील प्रशस्त टेरेस वर “सूर उरणकरांचा” ग्रुप तर्फे स्व.भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना गायनाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लता मंगेशकर यांचा आशीर्वाद घेऊन उपस्थितांचे स्वागत करून,संस्थापिका पूनम पाटेकर यांची ओळख करून ग्रुपची प्रस्तावना सादर करून निवेदक गौरी मंत्री यांनी तुज मागतो मी आता या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.
निवडक दर्जेदार आणि अजरामर गाणी गाऊन गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.15 गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेषकांना जागेवर खिळवून ठेवले.जवळ जवळ 200 प्रेक्षक उपस्थित होते.अनेक हिंदी व मराठी हिट चित्रपटातील हिट गाणी सादर करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी विविध चॅनलचे पत्रकार, डॉक्टर विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. अभिनेत्री वीणा जामकर यांच्या माता अलका जामकर , ज्येष्ठ शिक्षिका तसेच उत्तम गायिका यांनी कौतुकाची थाप आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

ग्रुप मधील सर्वच कलाकारांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. पूनम पाटेकर,गौरी मंत्री,अनिता घरत ,अनघा म्हात्रे ,निमा भानुशाली,प्रज्ञा पेडणेकर ,महेश घरत ,सचिन वैद्य ,विनोद ठाकूर, अंबरीश म्हात्रे,गणेश जाधव , भरत शेळके,दीनानाथ डांगे,योगेश भस्मे आणि राजेश डांगे या गायकांनी उत्तम सराव करून प्रेषकांना गाण्याची मेजवानी दिली.

कार्यक्रमाचा शेवट सर्वांचे आभार मानून पूनम पाटेकर यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याने झाला. या गाण्याने उपस्थितांचे मन आणि डोळे भरून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.