Press "Enter" to skip to content

रायगडात आणखी एका पत्रकाराला मारहाण

तीन तलाकची बातमी लावल्याने पत्रकाराला मारहाण, तीन वर्षापूर्वी लावलेली बातमी

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांसंदर्भात महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीने गृहमंत्र्यांना देणार निवेदन

सिटी बेल • रायगड • धम्मशील सावंत •

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले ही बाब गंभीर असून चिंताजनक देखील आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला म्हणजे देशाच्या संविधानिक अधिकारांवर व लेखनी स्वातंत्र्यावरील हल्ला मानला जातोय. तीन तलाकची बातमी लावल्याचा राग मनात धरून पत्रकाराला मारहाण केल्याची घटना म्हसळा शहरात नुकतीच घडली आहे.

रायगड जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांसंदर्भात महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीने राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे राज्याध्यक्ष धम्मशील सावंत यांनी सांगीतले. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा ही मागणी पत्रकार संघटना कित्येक वर्षे करीत आहेत. तीन तलाकची बातमी लावल्याने पत्रकाराला मारहाण झाल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. साजिद इनामदार असे आरोपीचे नाव आहे. नेरळ मध्ये काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलीस ( असलेल्या एकाने पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जिल्ह्यात पत्रकार हे जनतेचे प्रश्न मांडताना जीवावर बेतणार नाही ना या द्विधा मनस्थितीत आहेत.निकेश कोकचा हे एका वृत्तपत्रात म्हसळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

2019 साली साजिद इनामदार याच्या तीन तलाक संदर्भात त्यांच्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे आपली बदनामी झाली असून बातमी लावल्याचा राग साजिद याने मनात ठेवला होता. काल 10 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निकेश हा आपल्या कामासाठी बाजारपेठेत गेला होता.

काम आटोपून निघाला असता साजिद याने त्याला अडवून बातमी दिल्याने माझी बदनामी झाली असे बोलून कुठल्यातरी हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत निकेश जखमी होऊन त्याच्या उजव्या डोळ्याला जखम झाली आहे. निकेश याला मारहाण होत असताना बाजूच्या दुकानदारांनी मध्ये येऊन वाचवले. याबाबत निकेश याने दिघी सागरी पोलीस ठाण्यात साजिद विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून साजिद याला अटक करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.