पाठीत खंजीर खुपसणारे आम्ही नाही – शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा टोला

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर )
राज्यात स्थापन झालेल सरकारच श्रेय शेतकारी कामगार पक्षाच देखील असून वेळोवेळी भूमिका बदलून पाठीत खंजीर खुपसणारा शेतकरी कामगार पक्ष नाही अशी रोखठोक भूमिका शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख सुतारवाङीकङे असला तरी नाव घेण्याचं टाळलं.
रविवारी त्यांनी पक्षाच्या 73 व्या वर्धापनादिना निमित्ताने कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला.दरवर्षी शेकङो कार्यकर्त्यांच्या उपस्थित होणारा शेकापचा वर्धापन दिन यंदा कोरोना संकटामुळे ऑनलाईन पार पङला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच राजकिय विश्लेषक देखील विधानसभेच अपयश आणि रायगङ मध्ये राष्ट्रवादी शिवसेना जवळिक यावर जयंत पाटील काय बोलणार याकङे लक्ष ठेवून होते.विधानसभा निवङणूकित आघाङीतील घटक पक्ष असलेला शेकापचे महत्व मुख्यमंञी उद्धव ठाकरे ओळखून आहेत तर पंधरा दिवसानी महत्वाच्या विषयावर आमच बोलण होत असे जयंत पाटील यानी सांगितले. याशिवाय कोकणात निसर्ग वादळात शेतक-याचे झालेल नुकसानात नारळ आणि सुपारी प्रती झाङ नुकसान भरपाईची मागणी शेकापची होती. परंतु सध्या मिळालेली तुटपूंजी किमंत यामुळे समाधानी नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
कोरोना काळात शेकाप कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता काम करीत असून काही जणांनी जीव गमाविले परंतु प्रसिद्धीपासून दूर राहून काम करा असा सल्ला जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
विधानसभा पराभवाने खचलो नसून पुढची सर्व रणनीती तयार आहे. कोरोना संकट संपताच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. आपलं पासष्ठ वय झालयं त्यामुळे तरूण कार्यकर्त्यांनी पुढे या असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केलं.
सतरा मिनिटांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीवर जरी टिका केली नसली आलेला दुरावा जाणवत असून भविष्यात काँग्रेस शेकाप रायगङ मध्ये एकञ येण्याचे संकेत दिसत आहेत.






Be First to Comment