Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धा

राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत 53 किलोवजनी गटात खालापुर तालुक्यातील कुणाल पिंगळे राज्यात पहिला

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभादेवी – मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली असून स्पर्धेत महाराष्ट्र भरातून असंख्य व्यायामपट्टूंनी सहभाग दर्शवत आपआपली खेळी दाखवली असता या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील खेळाडूंनी नैपुण्य दाखवले आहे. घोडीवली गावातील युवा तरुण कुणाल पिंगळे याने 53 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णं पदकाचा मानकरी ठरला आहे.त्याच्या घवघवीत यशाने कुणाल पिंगळेची केरल येथे होणाऱ्या नँशनल स्पर्धेत निवड झाल्याने कुणाल पिंगळेला पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात येत आहेत.

कुणाल पिंगळे हा व्यायामपट्टु येत्या काही महिन्यानंतर केरल येथे होणाऱ्या नँशनल स्पर्धेकरिता सराव करीत आहेत. व्यायाम शाळेकडे तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणात जात असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणाईला व्यायाम शाळेकडे आकर्षित करण्याच्या संकल्पनेतून सर्वच स्तरावर व्यायामा निगडीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असताना याच अनुषंगाने प्रभादेवी – मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धा महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडली असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील असंख्य मातब्बर खेळाडूंनी सहभाग दर्शवत आपले कौशल्य सादर केले.

या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील स्पर्धकाने आपले वर्चस्व दाखवले असून या स्पर्धेतील 53 किलो वजनी गटात घोडीवली गावातील युवा तरूण कुणाल पिंगळे याने सुर्वण पदक पटकावून 53 किलो वजनी गटात राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कुणाल पुढील यश वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.