महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहावी च्या विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण यांच्या माध्यमातून मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी खोपटे येथील कर्मवीर भाऊराव पाटील भाग शाळेत पक्षाच्या 16 व्या वर्धापनाच्या दिनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी हायस्कूलचे चेअरमन राजन पाटील आणि राजेंद्र म्हात्रे यांनी मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आहेत . आदिवासी भागात नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेतअसे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
ह्या कार्यक्रमाला उपाध्यक्ष संदेश ठाकूर , उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत , राकेश भोईर , रोजगार स्वयंरोजगार चे रितेश पाटील , मनसे विभाग अध्यक्ष दिपक पाटील , शाखा अध्यक्ष ऍड . ओमकार पाटील , महाराष्ट्र सैनिक बबन ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील , निळकंठ पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment