Press "Enter" to skip to content

प्रथम नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा

ॲथलेटिक्स स्पर्धेत उरणच्या योगा विथ पूनम ग्रुपच्या खेळाडूंचे सुयश

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

प्रथम नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कुलगाव बदलापूर नगरपरिषद व मॅक्स फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल बदलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 1500 खेळाडू सहभागी झाले होते त्यात योगा विथ पूनम ॲथलेटिक्स उरण डाऊन नगर व जे एन पी टी चे खेळाडू सहभागी झाले होते.या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली.

1)व्ही. एम.श्रीलक्ष्मी – 60 मीटर धावणे प्रथम क्रमांक,लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक तसेच 100 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक

2) राम चौहान- भालाफेक द्वितीय क्रमांक तसेच गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक

3) देविना भोईर पोलीस कॉन्स्टेबल -गोळा फेक प्रथम क्रमांक तर 60 मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक

4) वैष्णवी -भालाफेक द्वितीय क्रमांक, गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक

5) स्नेहा जाधव -लांब उडी दुसरा क्रमांक

6) श्रेयस वैद्य -भालाफेक द्वितीय क्रमांक

7) वेदांत लवटे यांनी लांब उडीत द्वितीय क्रमांक पटकावून उरण तालुक्याचे नाव उज्वल केले याबद्दल त्यांचे प्रशिक्षक पुनम चौहान व राम चौहान आणि प्रकाश जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजेते खेळाडू स्पर्धाकांवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.