सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
शेतकरी कामगार पक्षाच्या नागोठणे शहराच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या नागोठण्यातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या ध्वजास पक्षाच्या आदेशावरून सलामी देऊन शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात व शहरात पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन पक्ष श्रेष्ठिंकडून करण्यात आले होते. त्यानुसार नागोठण्यातील शिवाजी चौकात शेकापच्या ध्वजास सलामी देण्याचा हा कार्यक्रम करण्यात आला. सलामी देण्याच्या या कार्यक्रमाला शेकापचे नारायण धा. भोईर ( गुरुजी ), आनंत वाघ, नजीर मोहाने, अरुण चोगले, जनार्दन सकपाळ, कासमभाऊ शिंदी, नाजीम सय्यद, जाणू हंबीर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.






Be First to Comment