फुंडे ते बोकडविरा ला जोडणाऱ्या पुलाचे काम माजी आमदार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या स्वखर्चाने सुरू
सिटी बेल • उरण • अजय शिवकर •
आठ महिन्यांपूर्वी फुंडे ते बोकडविरा ला जोडणारा जो पुल पडला होता त्याच्या मुळे डोंगरी ,पाणजे, आणि फुंडे गावातील ग्रामस्थांना तसेच उरण तालुक्यातील नागरिकांना जेएनपीटी आणि इतर उरण प्रवासा करिता विनाकारण त्रास सहन करावा लागत होता.

गेल्या आठ महिन्यांपासून उरणचे माजी आमदार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या अथक प्रयत्नातून तसेच कामगार नेते उरण विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख महादेव घरत यांनी वारंवार सिडको कडे पर्यायी मार्गाची मागणी केली होती.
त्याच पर्यायी रस्त्याचे काम आज तीन दिवस झाले मनोहरशेठ भोईर यांनी स्वखर्चातून चालू केले आहे आणि लवकरच ते पूर्ण करून उरण च्या जनतेच्या सेवे साठी सुरू करण्यात येणार आहे . त्यांच्या या कार्यासाठी फुंडे,पाणजे ,डोंगरी, बोकडवीरा गाव तसेच उरणच्या नागरिकांनी मनोहर भोईर व महादेव घरत यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत.








Be First to Comment