Press "Enter" to skip to content

शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

मनसे चित्रपट सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी कल्पेश कोळी

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

मनसे वहाळ पंचायत समिती अध्यक्ष कल्पेश भरत कोळी हे मनसेचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते असून पक्षाच्या प्रचार, प्रसारासाठी दिलेले योगदान लक्षात घेता कल्पेश कोळी यांची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती पत्र कार्याध्यक्ष शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत, चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष अक्षय सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातून कल्पेश कोळी यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडी बद्दल नवनियुक्त उपाध्यक्ष कल्पेश कोळी यांचा उलवे मनसे शहर जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी उलवे शहर अध्यक्ष राहूल पाटील,शहर सचिव मनोज कोळी,शाखाध्यक्ष चिराग कोळी,शाखाउपाध्यक्ष सुनिल कोळी,मनसैनिक संदीप म्हाञे,प्रतिक कोळी,अंकेश कोळी,कृष्णा कोळी, अभिषेक गायकवाड, विनायक कोळी,राजेश परमेश्वर आदी मनसेचे पदाधिकारी,मनसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.