जागतिक महिला दिवस उरण महिला काँग्रेस तर्फे जेएनपीटी टाउनशिप येथे साजरा
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आदेशानुसार 8 मार्च रोजी नवी मुंबई SEZ बिल्डिंग D विंग, चौथा मजला,NMGkS Office,सेक्टर, 11,जेएनपीटी टाउनशिप , उरण येथे महिला दिन काँग्रेस तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महीला जागतिक दीनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्षा ऍडव्होकेट श्रध्दाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी शुभांगीताई रोकडे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन तसेच उरण काँग्रेस कमिटी तर्फे हळदीकुंकू साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांच्या आरोग्या विषयी शुभांगी ताई रोकडे यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी कोकण विभाग अल्पसंख्याक सरचिटणीस श्रीमती अम्ररीन मुक्री ,उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, शहर काँग्रेस महिला अध्यक्षा श्रीमती अफसा मुक्री , जिल्हा उपाध्यक्षा संध्याताई ठाकुर, उपाध्यक्षा निर्मला पाटील, चंदा मेवाटी, रेखा धनश्री, योगसाधना पाटील,आश्रया शिवकर, निकीता पाटील, रंजना पाटील, भावना पाटील,करिष्मा म्हात्रे, भारती कांबळे, दर्शना म्हात्रे,अस्मिता गावंड,दिपाली पाटील, उज्वला तांडेल ,समिक्षा पाटील, रेश्मा पाटील , स्वप्नजा म्हात्रे ,सचिता वाघावले , शर्मिला घरत ,कुमारी अपुर्वा घरत, कोमल ठाकुर, मोनीका पाटील आदी अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.








Be First to Comment