रोहा तालुका सकल मराठा समाजाची मागणी
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरील नुकत्याच झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्ये प्रकरणी सापडलेल्या सर्वच नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली अाहे.
याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने रोहा प्रांताधिकारी व विभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले.
सकल मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी घडलेल्या कृत्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध केला.तांबडी येथील म्हांदलेकर कुटुंबीयांची सांत्वणपर भेट घेऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मराठा समाज आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.त्यानंतर रोहयाचे प्रांताधिकारी यशवतराव माने व विभागीय पोलिस अधिकारी श्री सुर्यवंशी यांना सदर मागणी बाबतचे निवेदन दिले.याप्रसंगी त्यांच्या समवेत रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख,महेश सरदार,दशरथ साळवी,संदीप सरफळे,निलेश शिर्के,सुहास येरूनकर,प्रशांत देशमुख, मोरेश्वर घारे,शशिकांत मोरे,मोहन घाटगे,अमित सावंत यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी या प्रकरणात ज्या आरोपींना अटक केली आहे.त्यांनी गुन्हा कबुल केला असल्याने कायद्याच्या बाबीत त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा सिध्द करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.या घटनेची तीव्रता प्रत्येक माणसाचे हृदय पिळवटून टाकणारी आणि संताप जनक असल्याने संपूर्ण रोहा तालुका हादरून गेला आहे.समाज भावना अत्यंत आक्रमक आहेत.आम्ही अजुन पर्यंत आमच्या प्रक्षुब्ध भावना रोखून आहोत.पण विलंब झाल्या त्या रोखणे कठीण होईल असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिस यंत्रणेने गुन्ह्याचा तपास अवघ्या बारा तासात लावल्याने समाधान व्यक्त करून याबाबत अधिक तपास करून याकरिता विशेष सरकारी वकील देऊन या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक वर घेऊन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.






Be First to Comment