विंधणे आदिवासी वाड़ी येथे जागतिक महिला दिन व सावित्री बाई फुले जयंती साजरी
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
दि. 8 मार्च 2022 रोजी महिला दिन व 10 मार्च 2022 रोजीच्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विंधणे आदिवासी वाडी, उरण येथे महिला मंचच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात सौ.ज्योती सकपाळ यांनी महिला दिनाचा इतिहास व महत्त्व सांगतानाच महिलांनी आजच्या समाजात सक्षम होणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्त्या सौ.आंम्रपाली गायकवाड यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी दिलेल्या योगदान बाबत अतिशय चांगली माहिती दिली.

आज देशात स्त्रिया ज्या ज्या क्षेत्रात पूढे आहेत ते केवळ सावित्रीबाई यांच्यामुळे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेमुळेच!, हे त्यांनी उपस्थित महिलांना पटवून दिले. सदर कार्यक्रमात सौ.रेखा म्हात्रे व सौ.वनिता घरत यांनी कार्यक्रमातील महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थित महिलांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमास आदिवासीवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुमन कातकरी, स्थानिक कार्यकर्त्या लता कातकरी, मनिषा कातकरी, मालूबाई कातकरी, विंधणे गृप ग्रामपंचायत माजी सरपंच महेश कातकरी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिपक कातकरी,सामाजिक कार्यकर्ते सुनिल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमास कॉ.रमेश ठाकुर, ॲड. विजय पाटील, कॉ.मनोहर घरत, विजय घरत आणि धनंजय म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती.








Be First to Comment