सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) #
कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि नागोठण्याजवळच असलेल्या श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालय ऐनघर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यात शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. या वर्षी दहावीचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालययाचा निकाल १०० टक्के लागला असून कु. जानवी सुनील हारपाल हिने ८४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच धनेश शंकर बावधाने (८० टक्के) व कुमारी निकिता तुळशीराम कोकले (७७.८० टक्के) यांनी अनुुुुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
ऐनघर येथील श्रीमती गीता द. तटकरे विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप तटकरे, संस्थेचे सचिव प्रकाश सरकरे, मुख्याध्यापक अनिल वाघ, शिक्षिक मनीषा पाटील, स्नेहल पाटील, अजित देशमुख, शैलेश गजभार, निलेश बिरगावळे तसेच ऐनघर पंचकोशीतील ग्रामस्थ व पालक यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






Be First to Comment