वाशी येशील तनिष्क ज्वेलर्समधील २ लाखाच्या बांगड्या चोरणाऱ्या महिलांना अटक
सिटी बेल • वाशी • संजय कदम •
महिलांना साड्या, दागिन्यांची भुरळ पडणं स्वाभाविकच आहे. पण या मोहापोटी आपण चोरी करणं केव्हाही उचित नाही. नवी मुंबईमधील वाशीयेथील तनिष्क ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून २ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पकडण्यात आल्या आहेत.
१० दिवसापूर्वी तनिष्क ज्वेलर्समध्ये २ महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने गेल्या. प्रथम त्यांनी सेल्सगर्लला बांगड्या दाखवण्यास सांगितले. त्यानंतर ब्रेसलेटची डिझाईन त्यांना दाखवण्यात आली. या दरम्यान त्या दोन महिलांनी ३७ ग्राम वजनाच्या सुमारे दोन लाख २१ हजार रुपये किमतीच्या बांगड्या हातचलाखीने गायब केल्या. त्यांनतर कोणतेही सोने खरेदी न करता त्या महिला निघून गेल्या.
सदर महिला निघून गेल्यांनतर सेल्सगर्लला दोन बांगड्या कमी असल्याचे निदर्शनास आले. दुकानामधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता त्या दोन बांगड्या सदर महिलांनी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासानंतर बांगड्या चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
Be First to Comment