आंबिवली येथे मोफत नेत्र तपासणी समवेत डोळ्यांवर १६ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
मानवी शरीरात डोळ्यांना खूपच महत्व असून,आपण त्यांच्याशिवाय जग पाहु शकत नाही. गेले दोन वर्ष कोरोनांच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. त्यातच हातावर आपले पोट भरण्यांची संख्या खूपच आहे.मात्र अश्या वेळी एखादे आजार झाल्यास त्यावर निदान करणे अशक्य होत आहे. मात्र शिवसेना युवासेना माजगाव ग्रामपंचायत विभाग व स्मितसंकल्प स्टेशनरी आंबिवली यांच्या माध्यमातून श्री भैरवनाथ मंदिरामध्ये मोफत नेत्राचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये जवळपास ५५ व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी १६ जणांना मोतीबिंदू च निदान करण्यात आले होते. त्या सर्वाना ५ मार्च रोजी शहापूर येथील दिव्यादृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून डॉ. नेवरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून राबविलेल्या या कार्यक्रमासाठी राजेश जगन्नाथ पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. मंगेश पाटील युवासेना अधिकारी माजगाव ग्रामपंचायत विभाग यांच्या नियोजनाखाली व सर्व शिवसैनिक युवासैनिक यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात आला.शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना मोफत आणि तत्पर सेवा मिळाल्याबद्दल सर्वांनी मंगेश पाटील व राजेश पाटील यांचे आभार मानले.








Be First to Comment